indian cinema heritage foundation

Mardani (1983)

Subscribe to read full article

This section is for paid subscribers only. Our subscription is only $37/- for one full year.
You get unlimited access to all paid section and features on the website with this subscription.

Subscribe now

Not ready for a full subscription?

You can access this article for $2, and have it saved to your account for one year.

Pay Now
  • Release Date1983
  • GenreDrama/Action
  • FormatColour
  • LanguageMarathi
  • Shooting LocationJayprabha Studios
Share
12 views

रामजी देसाई एक सधन शेतकरी, स्वभावने अत्यंत साधा सरळ एक वचनी रामा सारखा, यांच्या सुखी संसारात एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे त्यांना मुल बाळ नव्हते. बन्याच दिवसा नंतर सीमामाईला दिवस जातात, दोघानाही आनंद होतो.

सीताबाई प्रसुती व्यधनाने व्याकूळ आहे, सुईन ही खुप प्रयत्न करते पण उपयोग होत नाही ती चिंतातूर झालेल्या रामजीला बाहेर नाही. सीतामाई जामच अडलीय, आता गावातील नस।ला बोलावले पाहिजे, रामजी नोकराला पाठवतो.

निरोप पोहचल्यामुळे प्रमिला नर्स तयारी करून येऊ लागते तेवढयात रामजी भाऊबंध रंगराव रानबोके तीच्या आडवी कुन्हाड़ लावतो. गळया जवळ नेतो व सांगतो - ’’रामजीच्या पोराच्या नरडीचा घोट ध्यायचा आणि हे काम केलं नाही तर मुझ्या नरडीचा घोट मी घेईन’’ घाबरलेली नर्स मान्य करते व जाते. नर्स येते. सर्वाना आत न येण्याची ताकीद देऊन नर्स आत जाते. दाराला कडी लावते.

नर्स सीतामाईचं बाळंतपण करते, पहिला मुलगा होतो. जीवाला भ्यालेली नर्स मुलाला गावाच्या सोडन येते. नर्स परत घरात येते, सीतामाई दुसÚया एका मुलाला जन्म देते ती मुलगी असते, तीला जन्म देते व मरते.

देवळात टाकलेल्या मुलाला एक जोडपे घेऊन जाते. रामजी मुलीला आपल्या मेव्हण्याकडं नेतो. मुलीचं नाव अनुराधा ठेवतात. मुलाचं नाव देवळात सापडला म्हणून प्रसाद ठेवले जाते. मुलगी ज्युडो कराटे मध्ये प्रवीण होते. प्रसाद फौजदार होतो. अनुराधा आपल्याला भाऊ लाज्सरमुळे दुःखी तर प्रसाद बहिण नसल्यामुळे उदास.

व्यायाम शाळेत शिक्षण घेत असताना अनुराधाचे प्रेम अजित सावंत वर बसते ते लग्न करतात आणि ग्रामीण भागातच काम करायचे म्हणून ते भडगावच निवडतात. प्रसाद ही पोलीस खात्यातील आपल्या करिअर करता, नाठाळ अशा भडगावची निवड करतो.

रंगराव रानबोके नंतर त्याचा मुलगा प्रतापराव रानबोके या गावचा पुढारी झालेला असतो.

आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जून्या व नव्या नेतृत्वात संघर्ष सुरु आहे तरुण रक्ताला वाव द्यायचा असे महणतात पण प्रत्यक्षात नव्या नेतृत्वाचे खच्ची करण केले जाते. नवं नेतृत्व संपवलं जातं।

अजित सावंत व सत्ताधारी प्रतापराव रानबोके यांच्यात संघर्षाला गुरुवात होते. दोघे ही निवडणूकीच्या रिंगणात उतरतात. जनता तळमळीचा कार्यकर्ता अजित सावंतलाच निवडून देतात.

ज्यांना पराजयच माहित नाही अशा प्रतापराव रानबोके याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. प्रतापराव अजितला वाजत गाजत मिरवणूकीनं गावच्या चैकात आणतात व भर सभेत गोळया घलून खून करतात.

पिंडदानाच्या दिवशी कावळा शिवत नाही म्हटल्यावर अनुराधा सर्वांच्या समक्ष शपथ घेते. ’’हिंदू स्त्रीया नवरा मेल्यावर कुंकू पुसतात, विघवा म्हणून जगतात, पण मी मात्र कुंकू पुसणार नाही, माझ्या नवÚयाचा ज्यांची बेसावधपणे खून केला, त्यांना सावध करुन रक्ताचा बदला रक्ताने घेईन, तेव्हांच कुकू पुशीन’’ असं म्हणून ती कुंकू लावते. आणि कावळा पिंडाला शिवतो.

एक अबला सबला बनून, नवÚयाच्या खूनाचा बदला कशी घेते ते पडद्यावर पहा!

[From the official press booklet]