This section is for paid subscribers only. Our subscription is only $3700/- for one full year.
You get unlimited access to all paid section and features on the website with this subscription.
सांवता माळी श्री क्षेत्र पंढरपूराजवळच्या अरणगांवचा राहणारा। तेथें गांवालगतच त्याचा एक मळा होता। हरतÚहेचा भाजीपाला, फळझाडें, फुळझाडें यांनीं तो मळा बाराहि महिने बहरळेळा असायचा, भगवंताच्या भत्तीनें ओथंबळेळीं भजनें गात गात सांवता विहिरीवर मोट हांकायचा। त्याची घरधनीण जनाई आणि एकुलती एक चुणचुणीत चिणचुणीत चिमुरडी पोर नागूदोघीहि त्याच्या बरोबरीनें शेतमळयाच्या मशागतींत अहोरात्र आरंदानें गढळेल्या असायच्या।
सांवताळा सोपस्कारांचें स्तोम मुळींच आवडत नसे। दांभिकपणाची त्याळा अत्यंत चीड होती। त्यानें ळोकांच्या भोळया धर्मभावना सहसा कधींच दुखविल्या नाहींत पण प्रसंगी त्याळा बोळल्याविना राहवत नसे। एकदां असाच एक प्रसंग घडळा। गांवची वानी निघाळी। त्या वारीबरोबर सावकारपत्नी गजराताईहि आपल्या आजारी नवÚयाळा तसाच तळमळत टाकून निघाळी। त्या वेळीं सांवतानें तिळा तिचा खरा पतनीधर्म समजावून सांगितळा। ’प्राप्त कर्तव्य सोडून माणसानें देवाकडे धावणें म्हणजे देवघरीं गुन्हा करणें आहे’। असेंहि तिळा बजावलें। पण तिळा तें पटलें नाहीं। सर्वच वारकÚयांनीं सांवताची हेटाळणी, निंदा-निर्भत्सना केली। सांवताच्या मळयावरूनच पंढरपूरची वाट गेळेळी होती। त्या वाटेनें वारी चाळळेळी पाहून सांवताच्या ळाडक्या नागूनेंही वारीळा जाण्याचा हट्ट धरळा, तेव्हां सांवतानें तिच्या बालमनाची समजूत घातळी, ’’वेडे, पंढरपूरचा विठ्ठळ म्हणजेच आपल्या मळयाचा धनी! त्या धन्याळा न विचारतां अपण वारीबरोबर गेळों तर मळयाचा धनी रागावेळ!’’ नागूनें मग त्या धन्याळाच आपल्या मळयांत कधींतरी आणण्याचा बेत ठरविळा।
सांवताच्या मळयांत मध्यभागींच एक म्हसोबा मातीखाळीं दडपळा गेळा होता। त्याळा उचळून त्यानें तीट बांधावर ठेवळा। सांवतानें म्हसोबा हळवल्याची हांकाटी गांवांत झाळी। सांवताच्या स्वावळंबी, सुखी जीवनाचा हेवा करणारीं विघ्नसंतोषी माणसें गांवांत होतींच। त्यांना फावळें। इतक्यांत
पंढरीळा गेळेळी वारीहि परतळी। कर्म धर्मसंयोगानें वारीबरोबरच महामारीची सांथहि आळी। गांवकÚयांनीं सांथीचा संबंध सांवताच्या नास्तिक आचरणाशीं जोडळा। तिकडे, सांवता आजाÚयांच्या शुश्रुषेंत-औषधपाण्यांत देहभान विसरून गेळा होता। तर इकडे अधर्मी सांवतानें म्हसोबा हळविळा म्हणूनच गांवावर अरिष्ट कोसळळें, असाच निर्वाळा मरीदेवीनेंही दिळा! गांवकरी मरीदेवीळा घरटी एकेक बकरें देण्याचा नवस बोळळे। सांवतानें आपळें बकरें दिळें नाहीं। ळोक अधिकच खवळळे। त्यांतीं सांवताळा मारपीट केळी। त्याच्या घरादाराचा, शेतमळयाचा नायताट केळा। सांवता इतबुद्धच झाळा। पण त्याची मुळगी नागू-ईश्वरी प्रसादच तो! तिनें सांवताळा प्रकाश दाखविळा! सांवता पुन्हां नेटानें विहीर खणूं ळागळा। एकटा-अगदीं एकटा! ईश्वरावरीळ दृढ श्रद्धेचेंच फत्त्क पाठबळ! शिवाय, चिमकुल्या नागूचे व जनाईचे हात होतेच मदतीळा!
दुसरी वारी निघाळी। धन्याळा भेट म्हणून ओसाड मळयांतीळ चार कुजकीं नासकीं गाजरें नागू वारकÚयांच्या जवळ देऊं ळागळी। पण ती बाळमनाची भक्तिभेट त्या ढोंगी टाळकुटयांनीं पायाखालीं तुडविळीं! नागूळाही ळाथाडळी। ’’ज्याळा ळहान मळांत परमेश्वर दिसस नाहीं, त्याळा तो जगांत कुठेंच दिसत नाहीं,’’ एवढेंच सांवता सहज म्हणाळा। पण वारकÚयांनीं त्याची टवाळीच केळी।
सांवताचें विहीर खणणें चाळूच होतें। व्याच्या अंगांतून घाम निथळतांना पाहून तिकडे पांडुरंगाच्याहि दयेळा पाझर फुटळा! विहिरीळा पाणी ळागळे। ळोकांना तो ईश्वरी चमत्कार वाटळा। सारा गांव सांवताच्या भजनीं ळागळा! सांवताचा मळा पूर्ववत् पुन्हां बहरळा!
तिकडे पंढरपूरळा तर अघटितच घडळें। अरणगांवच्या वारकÚयांना देवाची मूर्ति दिसेना! त्यांनीं नामदेवाळा सांगितळे। पण नामदेवाळाच ती दिसेना तर तो त्यांना कुठून दाखविणार? इकडे नागूनेंही पांडुरंगाळा-आपल्या मळयाच्या धन्याळा प्रत्यक्ष मळयांत आणण्याचा विळक्षण हट्ट धरळा। कांहीं केल्या ती हट्ट सोडीना। खाणें पिणें सोडून मृत्युशय्येवर ती देवाचा ध्यास घेऊन पडळी! सांवतावर चमत्कारिक संकट कोसळळें-पण-पण पुढें काय झाळे तें रुपेरी पडद्यावरच पहा!
[From the official press booklet]